
पत्नी व मेहुणीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या एका पोलिसाला त्याच्या सहकाऱ्यांनी मोठे पाऊल उचलण्याआधीच रोखले. माझी मुलं IAS होईपर्यंत माझं तेरावं घालू नका, असे स्टेटस त्याने ठेवले होते.
ध्रुव भूषण दुबे असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशच्या नोयडा शहरातील पोलीस आयटी सेलमध्ये कामाला आहे. त्याला दोन मुलं असून त्याची व त्याच्या पत्नीची कायम भांडणं होत होती. त्यावरून पत्नी व मेहुणी त्याला सतवायच्या. या सर्वाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने त्याची सुसाईड नोट थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकली.
ध्रुवच्या सहकाऱ्यांनी त्याचे स्टेटस पाहताच तत्काळ अॅक्शन घेत त्याचे लोकेशन शोधून काढले. धुव हा परीचौकच्या आसपास कुठेतरी असल्याचे त्यांना दिसल्यानंतर ते त्याच्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी ध्रुव गाडीत बसलेला होता. त्याला पोलिसांनी तत्काळ पोलीस स्टेशनवर आणले व तिथे त्याचे समुपदेशन करण्यात आले.



























































