लॉकडाऊनमध्ये हॉस्टेलवर अडकला नऊ वर्षांचा मुलगा, वॉर्डनने केला लैंगिक अत्याचार

1499

उत्तराखंडमधील देहरादून येथे असलेल्या एका हॉस्टेलमध्ये वॉर्डनने तिसरीतील वर्गातल्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा मुलगा लॉकडाऊनमुळे शाळा बंद असूनही उत्तरप्रदेशमधील त्याच्या घरी परतू शकला नव्हता. हॉस्टेलमधील बरिचशी मुलं घरी गेली होती. त्याचाच फायदा घेत वॉर्डनने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. हरिश कुमार असे त्या नराधमाचे नाव असून त्याने तब्बल दोन महिने त्या मुलावर अत्याचार केले.

उत्तर प्रदेशमधील सिगडी येथे राहणारा हा मुलगा देहरादून येथील शाळेत शिकतो व तेथील हॉस्टेलमध्येच राहतो. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जारी केल्यामुळे हा मुलगा हॉस्टेलवर अडकला. उत्तराखंडमध्येच राहणाऱ्या मुलांच्या पालकांनी त्यांना हॉस्टेलमधून घेऊन गेले. मात्र या मुलाचे पालक दुसऱ्या राज्यात राहत असल्याने तो हॉस्टेलवरच अडकला. त्या दरम्यान हॉस्टेलचे वॉर्डन हरिश कुमार याने सुरुवातीला मुलाला त्याची खोली साफ करायला सांगतिली. त्यानंतर त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. लॉकडाऊन मध्ये सूट दिल्यानंतर त्याचे आई वडिल शनिवारी 6 जून रोजी त्याला घ्यायला पोहोचले. तेव्हा वॉर्डनने आता शाळा सुरू होणार अअसल्याने त्याला घेऊ जाऊ नका असे पालकांना सांगितले. मात्र पालकांनी वॉर्डनचे न ऐकता मुलाला घेऊन गेले. हॉस्टेलमधून बाहेर पडताच मुलाने पालकांना त्याच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला.

या प्रकरणी मुलाच्या पालकांना रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे,. त्यानंतर पोलिसांनी हॉस्टेलमध्ये जाऊन वॉर्डन हरिश कुमार याला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या