आईने प्रियकरासोबत मुलीला पकडले, नंतर रेस्टॉरेण्टमध्येच केली दोघांची चपलेने धुलाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर दरदिवशी नवीन नवीन व्हिडीओ ट्रेण्ड होत असतात. यात काही मजेदार व्हिडीओ असतात तर काहीवेळेला भावूक करणारे व्हिडीओही समोर येतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. जिथे आई रेस्टॉरेण्टमध्ये मुलीला प्रियकरासोबत रंगेहात पकडते. पकडते आणि दोघांसोबत असे काही करते की सगळेच अवाक होऊन जातात.

व्हेलेटाईन डे च्या दिवशी मुलगी लपून छपून आपल्या प्रियकराला भेटायला एका रेस्टॉरेण्टमध्ये जाते. दोघंही खायला बसलेले असतात आणि त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. पण मुलीला कळलेच नाही की तिच्या आईला तिच्यावर संशय आला आहे. तिची आई थेट रेस्टॉरेण्टमध्ये पोहोचली आणि मुलीला रंगेहात पकडले. त्यानंतर त्या आईने चप्पल काढून मुलीसह तिच्या प्रियकराची धुलाई केली. अशाप्रकारे व्हेलेटाईन डे दिवशी दोघांची चांगलीच पिटाई केली आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळले नसले तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्विटरवर @gharkekalesh या आयडीवरुन शएअर करण्यात आला आहे. 22 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्य़ंत 22 लाख 42 हजार पेक्षा जास्त वेळा पाहण्यात आला आबे. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. तर युजर्सनी व्हिडीओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी बोलतंय, हे पाहून चांगल वाटत आहे, तर कोणी बोलतय मुलं झाल्यानंतर मुलगा आपली त्यांना स्टोरी सांगेल आणि म्हणेल तुमच्यासाछी सासूचा मार खाल्ला.