वरूण धवन होणार बाबा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याने आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवरून तो लवकरच बाबा होणार असल्याची घोषणा केली आहे. वरूण धवन आणि नताशा दलाल हे जोडपे 24 जानेवारी 2021 लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

हा फोटो नताशा आणि वरूण यांच्या मुंबईच्या घरातील आहे. फोटोमध्ये वरूण नताशाच्या बेबी बंपवर किस करताना दिसत आहे. या फोटोसोबत “आम्ही प्रेग्नंट आहोत… तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम हवे आहे” असे कॅपशन दिले आहे.