ताडी उतरली… ऑनड्युटी ताडीचा मोह भोवला, बसचालक निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vasai-virar-transport

सामना प्रतिनिधी । वसई

कामावर असताना वसई-विरार महापालिकेची बस थांबवून ताडी खरेदी करण्याचा मोह बस चालकाला चांगलाच भोवला आहे. या मोहापायी त्याचे निलंबन करण्यात आले आहे. शकील जबरा तडवी असे ताडी खरेदी करणाऱ्या बस वाहन चालकाचे नाव आहे.

शकील जबरा तडवी हे वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत होते. दिनांक 1 जून रोजी ते विरार (पश्चिम) ते नवापूर या मार्गावरील बसवर होते. कामावर असताना नवापूर या शेवटच्या बस थांब्यावर बस उभी होती. त्यावेळी बस चालक शकील तडवी ताडी आणण्यासाठी गेले. त्याच्या व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवरून, बातम्या वृत्तपत्रांतून झळकल्या. अखेर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर 2 जूनपासून त्यांना निलंबित करण्यात आले.