वसंत मोरे यांची राजकीय हत्या, रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हलाकपट्टी करण्यात आल्यानंतर माजी मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे चांगले काम करतात. परंतु आज ज्या पद्धतीने पक्षामध्ये खांदेपालट झाले ते दुर्दैवी आहे. वसंत मोरे यांनी प्रभाग शांत ठेवण्याची भूमिका घेतली, परंतु राजकीय डाव खेळून त्यांच्याविरोधात खेळी खेळली गेली, असे त्या म्हणाल्या.

वसंत मोरे लोकप्रतिनिधी होते, असे म्हणत पक्षांतर्गत धुसफुसीला कंटाळून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्याचे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. तसेच मी पक्ष सोडला तेव्हा बंधू (वसंत मोरे) ताईंनी राजकीय आत्महत्या केल्याचे म्हटले होते. परंतु आज वसंत मोरे यांची राजकीय हत्या झालीय की आत्महत्या केलीय हे उभा महाराष्ट्र बघतोय ही दुर्दैवी गोष्ट आहे.

दरम्यान, भोंग्याच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना पुणे शहराच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.