Photo – घरात ठेवू नका या वस्तू, पैसे टिकणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसा सर्वच जण मोठ्या मेहेनतीने कमवत असतात. तो टिकावा म्हणून या ना त्या प्रकारे प्रयास करत असतात. वास्तू शास्त्रात घरात पैसा टिकावा म्हणून काय करावे काय ठेवू नये हे सांगितलेले आहे.

saving-money-art

आपल्या घरातील कपाटातील लॉकरचे तोंड हे दक्षिण दिशेला असू नये त्यामुळे घरात आर्थिक चणचण राहते.

money

वास्तु शास्त्रानुसार लॉकरचे तोंड हे कायम उत्तर दिशेकडे असावे.

money

घरात कॉईन कधीच अस्ताव्यस्त पडलेले असू नयेत. त्यामुळे घरात कर्ज वाढू लागतं व पैसा कमी होत जातो.

coins1

घरात फुटलेली काच ठेवू नये. अशा वस्तू ठेवल्याने पैसे कमविण्यात संकटं येतात.

broken-mirror

कपाटात किंवा पैसे जिथे ठेवतो अशा ठिकाणी कधीच परफ्यूम किंवा अत्तर ठेवू नये. त्यामुळे पैशाला नुकसान पोहोचते.

perfume

घरात कोणत्याही भिंतीला भेगा असू नयेत. त्यामुळे घन प्राप्तीचे रस्ते बंद होतात. त्यामुळे घरात आर्थिक चणचण जाणवते.

wall-damage

रात्री खरकटी भांडी कधीच ठेवू नये. त्यामुळे घरात समृद्धी नांदत नाही.

gallery

घरात प्लास्टिकची झाडं ठेवू नयेत. त्यामुळे पैसे यायचे रस्ते बंद होतात. तर त्याऐवजी खरी झाडे ठेवावीत त्याने धनलाभाचे रस्ते मोकळे होतात.

save-money

घरात ठेवलेली झाडे ही पश्चिम व दक्षिण दिशेला ठेवू नयेत.

plant-2

घरात नळ गळत असेल तर तो तत्काळ बदलावा. गळणाऱ्या नळासारखाच पैसा देखील गळत राहतो.

tap