
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनी केरळमचा मुख्यमंत्री ठरला आहे. काँग्रेसचे नेते व्ही. डी. सतीशन हे केरळमचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीत सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसच्या दीपा दासमुन्शी यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात आला. सतीशन हे पारावूर येथून सलग सहा वेळा आमदार झालेले असून गेल्या विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. विद्यार्थी चळवळीपासून राजकारणाची सुरुवात करणारे सतीशन हे काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.




























































