
बॉलिवूडचा स्टार अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने रविवारी ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अ गटातील मुलांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला. वेदांतने ही स्पर्धा 16:01.73 सेकंदात पूर्ण केली. यामुळे 2017 मध्ये त्याचा सहकारी अद्वैत पेजने सेट केलेला 16:06.43 सेकंदांचा विक्रम वेदांतने मोडीत काढला आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेदांतने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या कर्नाटकच्या अमोघ आनंद व्यंकटेश (16:21.98 सेकंद) आणि बंगालच्या शुभजित गुप्ता (16:34.06) यांचा पराभव केला. कर्नाटकच्या हर्षिका रामचंद्रनने 400 मीटर फ्रीस्टाइल गट 2 मध्ये मुलींच्या 4:29.25 सेकंदात नवा रेकॉर्ड केला.
Never say never . 🙏🙏🙏❤️❤️🤗🤗 National Junior Record for 1500m freestyle broken. ❤️❤️🙏🙏@VedaantMadhavan pic.twitter.com/Vx6R2PDfwc
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) July 17, 2022
रुजुला एस ही तिची राज्य सहकारी जलतरणपटू दुसरी आली. हर्षिकाने 200 मीटर स्पर्धा 2:23.20 च्या वेळेत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले आणि तीन वर्षांपूर्वी अपेक्षा फर्नांडिसने (2:23.67 सेकंद) सेट केलेल्या मीट विक्रमाला मागे टाकले. महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिसने 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक जिंकले. या सापर्डेत एकूण 31 पदकांसह कर्नाटक आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र 17 पादकांसह दुसऱ्या आणि तेलंगणा आठ पादकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.



























































