
देशात गेल्या काही दिवसात भाज्यांचे दर (Vegetables Price) गगनाला भिडले आहेत. प्रत्येक भाजीची चव वाढवणारे टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये प्रति किलो आहेत. तसेच कांद्याचे दरही वाढले आहेत. कांदा प्रति किलो 60-80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही तर काही उदाहरणे आहेत, सर्वच भाज्याचे दर वाढले आहेत. भाज्यांचे दर हे सातत्याने वाढत आहे (Vegetables Price Hike).
भाज्यांचे दर वाढण्यामागिल कारणं समोर आली आहेत. डिझेलचे वाढते दर आणि पाऊस ही प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.
डिझेलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्या पार गेले आहेत. त्याचा परिणाम माल वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. अशातच पीक हातात आले असताना पावसाची हजेरी शेतकऱ्यांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. त्याचाही परिणाम भाज्यांच्या दरावर पाहायला मिळत आहे.
भाज्यांचे दर
टोमॅटो – 60 रुपये किलो
बटाटे – 25 ते 30 रुपये किलो
कांदा – 60 ते 70 रुपये किलो
भेंडी – 50 ते 60 रुपये किलो
वांगी – 30 ते 40 रुपये किलो
गाजर – 50 ते 60 रुपये किलो
कोथिंबीर जुडी – 100 रुपये




























































