
नवी दिल्लीतील न्यायालय मंगळवारी सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 17 जानेवारी 2014 रोजी पुष्कर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. या प्रकरणात कॉंग्रेसचे खासदार आणि सुनंदा पुष्कर यांचे पती शशी थरूर मुख्य आरोपी आहेत. थरूर सध्या जामिनावर आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात कलम 8 8–ए (क्रूरता आणि मानसिक छळाचा आरोप) आणि 6०6 (आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आपला निकला राखून ठेवला होता. मंगळवारी याप्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद एकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी सुनंदा पुष्कर तणाव आणि छळामुळे मानसिक ताणावाखाली होत्या असे सांगितले. तसेच त्यांनी असा युक्तिवाद केला की हा अपघाती मृत्यू नव्हता. शवविच्छदेन अहवालात विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. इंजेक्शनद्वारे हे विष देण्यात आल्याचेही त्यात नमूद होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. श्रीवास्तव असेही म्हणाले की सुनंदा यांना यापूर्वी कोणताही आजार किंवा त्रास नव्हता. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून ाणतणाव आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा तसेच मानसिक छळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते.
थरूर यांचे वकील विकास पाहवा यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, थरूर यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. फक्त शक्यता लक्षात घेत थरूर यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. तसेच शवविच्देन अहवालात इंजेक्शनद्वारे विष देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तो मुद्दा मान्य होऊ शकत नाहीत.शशी थरुर यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचा स्वभाव लक्षात घेत ते अशाप्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्थ नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



























































