टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचे माजी कर्णधार, ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुलं, सुना, नातवंडं असा परिवार आहे. प्रसिद्ध अभिनेता अंगद बेदी हा त्यांचा मुलगा आहे.  बिशन सिंह बेदी हे 1966 ते 1979 या दरम्यान कार्यरत होते. त्यांनी एकूण 67 कसोटी सामने खेळले आणि त्यात 266 बळी घेतले. टाइम्स ऑफ इंडियाने या संबंधीचं वृत्त दिलं आहे.

1970च्या दशकात हिंदुस्थानी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या चौकडीतील एक एक होते. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी झाला. बिशन सिंग बेदी यांच्या निधनामुळे हिंदुस्थानी क्रिकेट विश्वात डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.