रत्नागिरीत पदभ्रमंती चळवळ राबवणारे मोहन खातू यांचे निधन

315

नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्यवाह आणि रत्नागिरीमध्ये पदभ्रमंतीची चळवळ राबवणारे मोहन खातू यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

रत्नागिरीमध्ये पदभ्रमंतीची चळवळ राबवण्याचे काम मोहन खातू यांनी केले. त्यांनी स्वतः हिमालयाचा बेस कॅम्प, नेपाळमधील पोखरा व्हॅली येथे पदभ्रमंती केली. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या पदभ्रमंतीमध्ये त्यांचा सहभाग असायचा. रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेच्या संशोधनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. अतिशय गरीब परिस्थितीवर मात करून त्यांनी मारुती मंदिर येथे ‘हॉटेल गोपाळ’ सुरू केले. सुरुवातीला गोणपाटामध्ये वडापावची गाडी चालायची. पण त्यांनी तीस वर्षांत गोपाळ हॉटेलला ख्याती मिळवून दिली. हॉटेल गोपाळमध्ये अनेक साहित्यिक, राजकीय मंडळी बसून चर्चा करू लागली. नवनिर्माण शिक्षण संस्थेची संकल्पनाही या गोपाळ हॉटेलमध्येच उदयाला आली. या नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्यवाहपद खातू यांनी भूषवले.

आपली प्रतिक्रिया द्या