विकी-कतरिना झाले आई-बाबा! गोंडस बाळाला दिला जन्म

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना हे सेलिब्रिटी जोडपे आता आई-बाबा झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. Blessed अशी कॅप्शन देत त्यांनी एक पोस्टर शेअर केले आहे. आम्ही खूप प्रेमाने आणि आनंदाने आमच्या मुलाचे स्वागत करतोय, असे पोस्टरमध्ये लिहिलेले दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कतरिना आणि विकी यांनी 2021 साली राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती. सप्टेंबर महिन्यात आपण प्रेग्नंट असल्याचे कतरिनाने जाहीर केले होते.