डास मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अगरबत्त्यांमुळे आरोग्याच्या आणि श्वसनाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्याचा वापर थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अगरबत्त्या अवैध असून त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती होम इंन्सेक्ट कंट्रोल असोसिएशनचे (एचआयसीए) मानद सचिव जयंत देशपांडे यांनी दिली.
























































