Video साडीत हे जरा अवघडच, अभिनेत्री गौतमी देशपांडेनं पोस्ट केला तो व्हिडीओ

फोटो आणि व्हिडीओ - गौतमी देशपांडे इंस्टाग्रामवरून

‘माझा होशील ना’ या मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडेची भूमिका प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली आहे. सई नावाची भूमिका साकारताना तिनं लोकांची मनं जिंकून घेतली आहे. मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यामुळे या मालिकेची आणि त्यातील पात्रांची चर्चा देखील होत असते.

गौतमी देशपांडे आपल्या सोशल मीडिया हँडलवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. कधी फोटो, कधी गाणे, कधी सेटवरची धमाल, अशा गोष्टी ती सोशल हँडलवरून पोस्ट करत असते. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. तिच्या पोस्टवर व्ह्यूज, लाइक्स, कमेंटचा पाऊस असतो. यावरूनच पेक्षकांच्या पसंतीची पावती मिळते.

गौतमीनं दोन दिवसापूर्वीच एक व्हिडीओ इन्टाग्राम अॅपवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ सेटवरचा होता. त्यामध्ये गौतमी म्हणजे जुई आणि बाप्पा जोशी म्हणजे दादा मामा असे दोघं बॅडमिंटन खेळताना दिसतात. यावेळी भूमिकेत असलेल्या सईनं साडी नेसली आहे. त्यामुळे बॅडमिंटन खेळताना तिची जरा गंमतच उडाली आहे. तिनं स्वत: पोस्टमध्ये तसं म्हटलं आहे की, साडी नेसून बॅडमिंटन खेळणं तसं अवघडच आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

फोटो सौजन्य – गौतमी देशपांडे इंस्टाग्रामवरून ( Td_photography)

आपली प्रतिक्रिया द्या