Video – इतिहासाचा साक्षीदार लोहगडचं सौंदर्य ड्रोनच्या नजरेतून

2091

लोहगड… नावाप्रमाणेच लोखंडासारखा भक्कम आणि आजही महाराष्ट्राच्या दैदिप्यमान अशा इतिहासाची साक्ष देत उभा आहे. महाराष्ट्राचीच नव्हे तर हिंदुस्थानची शान असलेल्या गडांपैकी एक लोहगड. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून जवळच हे ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकला होता. तसेच सूरतेच्या हल्ल्यातून जिंकून आणलेलं धन या किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती देत महाराष्ट्र इन्फोसेंटरनं लोहगडाचं विहंगम दृष्य दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या