
राजस्थान रॉयल्सने शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात सुरुवातीपासूनच राजस्थानचे पारडे ज़ड दिसले. जबरदस्त गोलंदाजी व क्षेत्ररक्षण राजस्थानकडून दिसून आले. यात चेतन सकारियाने घेतलेला फ्लाईंग कॅच तर सर्वांच्या लक्षात राहिल असा आहे.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 133 धावा केल्या. क्रिस मॉरिसच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे कोलकात्याचे फलंदाज नांगी टाकताना दिसले. असे असतानाच दिनेश कार्तिक सारखा आश्वासक फलंदाज मैदानावर होता. 25 धावांवर असलेला कार्तिक मोठी खेळी करणार असे दिसत असतानाच चेतन सकारियाने त्याला मोठा धक्का दिला. कार्तिकने एक्स्ट्रा कव्हरला शॉट मारला. त्यावेळी त्याचा झेल घेण्यासाठी चेतन सकारियाने हवेत उडी घेतली व झेल घेतला.
Sakariya takes flight to catch one https://t.co/iumxVpsy71
— Bishwa Mohan Mishra (@mohanbishwa) April 25, 2021




























































