Video – पाहा जान्हवी कपूरची जबरदस्त मिमिक्री, नक्कीच तुम्हाला आवडेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चांगलीच चर्चेत आहे. जान्हवी एकापेक्षा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती मिमिक्री करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत भांडताना दिसत आहे. मात्र जान्हवी खरी खुरी भांडत नसून तिने बिग बॉसमधील एका स्पर्धकाची मिमिक्री केली आहे. पूजा मिश्रा ही त्या सिझनची वादग्रस्त स्पर्धक होती व या व्हिडीओत जान्हवी पूजाची नक्कल करत आहे.

बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये पूजा मिश्रा व सोनाली निगरानी यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला. त्या भांडणाची डिट्टो मिमिक्री जान्हवीने केली आहे. जान्हवीच्या या व्हिडीओ सात लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

जान्हवीच्या मिली या चित्रपटाचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट तिचे वडील बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन कंपनीचा असून घरच्या कंपनीच्या चित्रपटात ती पहिल्यांदाच काम करत आहे. जान्हवी दोस्ताना 2 चित्रपटातही दिसणार आहे.