
अनेकांना पराठा खायला प्रचंड आवडतो. दिल्लीत तर स्ट्रीट फूड म्हणून पराठ्याला जास्त पसंती आहे. पराठ्यासाठी तेल, बटरचा वापर केला जातो. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पराठा शेकवण्याऐवजी तेलात बुडवून दिला जात आहे. अशाप्रकारचा पराठा खाणे म्हणजे गंभीर आजाराला आमंत्रण आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड वैतागले आहे.
गरमा गरम बटर लावलेल्या पराठ्याचे नाव ऐकून लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडचे पाणी निघून जाईल आणि पुन्हा पराठा खाण्याची इच्छा होणार नाही. या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात एक व्यक्ती विचित्र प्रकार पराठा बनवताना दिसत आहे.
View this post on Instagram
येथे दुकानदार पराठा पलटून तेल किंवा बटर लावण्याऐवजी त्याच्यावर तेल ओतताना दिसत आहे. तो दुकानदार त्या पराठ्यावर एवढे तेल ओततो की, तो पराठा तेलात पूर्णपणे बुडतो. त्यानंतर दुकानदार थोडं तेल काढून दुसऱ्या भांड्यात ठेवतो. या दरम्यान भरपूर तेल खाली सांडत. त्यानंतर तो पराठा पलटतो आणि पराठा तयार तर होतो मात्र भरपूर तेल त्यावर असते.
पराठा बनवताना अनेकदा पाहिले असेल की, छोट्या भांड्यात तेल किंवा बटर घेऊन पराठा शेकवताना पाहिले असेल. मात्र अशाप्रकारचा पराठा बनवण्याचा व्हिडीओ याआधी पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहीलेय, हा पराठा पाहून हार्ट अटॅक आला, तर अन्य यूजरने लिहीलेय, साक्षात यमराज पराठा बनवताना, तर अनेक युजर्संनी हार्ट अचॅक येण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युजर्संनी याला मृत्यू येण्याचा पराठा बोलले आहेत.