मी आक्रमक, चौथ्या क्रमांकावर खेळायला आवडेल! अष्टपैलू विजय शंकरची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘मी आक्रमक फलंदाज असून मोठे फटके खेळणे हा माझ्या फलंदाजीचा स्वभावधर्म आहे. जर मला फलंदाजीत बढती देण्यात आली तर मी नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो. चौथ्या क्रमांकावर खेळायला मिळाले तर मला खूप आनंद होईल. मी मैदानात जाऊन तेव्हा सामन्याची जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे कामगिरी करेन’, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने इंग्लंडला प्रयाण करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दोन खेळाडूंच्या नावावर सर्वाधिक वर्ल्डकप खेळण्याचा विक्रम, एक सचिन दुसरा?

टीम इंडियाच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. याबरोबरच युवा खेळाडूंनादेखील संघात संधी मिळाली आहे. मात्र त्यापैकी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण असेल, याबाबतचा तिढा अजूनही कायम आहे. यासंदर्भात आता टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने आपण चौथ्या क्रमांकावर खेळण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे.

Photo : वर्ल्डकपमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेले फलंदाज

‘चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याच्या दृष्टीने मी तयारी करत आहे. मी आधीपासूनच या स्थानासाठी तयारी करत होतो. त्यामुळे आता मी मानसिकदृष्टय़ा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्यास सज्ज झालो आहे. फलंदाजीतील चौथा क्रमांक हा खूप कठीण असतो. कारण कधी चौथ्या क्रमांकाचा खेळाडूला सातव्या किंवा आठव्या षटकात खेळायला यायला लागू शकते, तर कधी तोच खेळाडू 30 ते 35 व्या षटकांत खेळायला येऊ शकतो. सामन्यातील किंवा डावातील हे दोन टप्पे अतिशय भिन्न आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्यासाठी मी स्वतःला तयार केले आहे’, असेही विजय शंकरने सांगितले.

सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनायचेय

‘टीम इंडियाकडून जेव्हा मला संधी मिळाली  तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांत मी टीम इंडियासाठी उत्तम कामगिरी केली आहे. शेवटच्या टप्प्यात गोलंदाजी केली आहे. कठीणप्रसंगी चांगली फलंदाजी केली आहे. मला नेहमीच सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनायचे होते आणि त्या दिशेने माझे प्रयत्न सुरू आहेत याचा मला अभिमान आहे’ असेही विजय शंकरने शेवटी सांगितले.

इंग्लंडमध्ये ‘असे’ असेल टीम इंडियाचे विश्वचषकाआधीचे वेळापत्रक