इंग्लंडमध्ये ‘असे’ असेल टीम इंडियाचे विश्वचषकाआधीचे वेळापत्रक

45

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 30 मे पासून सुरू होणार आहे. या आधी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीकडून 31 जानेवारीला जाहीर करण्यात आले. हिंदुस्थानी संघ या वेळी 2 संघांशी सराव सामने खेळणार आहे. हिंदुस्थानचा पहिला सराव सामना 25 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सराव सामना बांगलादेशशी 28 मे रोजी होणार आहे. या सराव सामन्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप 2019 रंगणार आहे.

टीम इंडिया विश्वचषकाच्या 8 दिवस आधी इंग्लंडला रवाना झाली आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर विश्वचषकाचे मूळ सामने सुरू होईपर्यंत असे असेल इंडियाचे वेळापत्रक –

22 मे – मुंबईहून इंग्लंडसाठी संघ रवाना
23 मे – विश्रांतीचा दिवस. संघ व्यवस्थापनाची बैठक. त्यानंतर संपूर्ण संघ आणि चमू यांची एकत्रित बैठक
24 मे – ओव्हल मैदानावर पहिले पूर्ण सराव सत्र. त्यानंतर सर्व कर्णधारांच्या पत्रकारांच्या औपचारिक गप्पा.
25 मे – न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता)
26 मे – कार्डिफकडे रवाना
27 मे – सोफिया गार्डन्स मैदानावर सराव सत्र. त्यानंतर पत्रकार परिषद. दिवसअखेरीस संघातील वरिष्ठ अनुभवी खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांची बैठक’
28 मे – बांगलादेशशी दुसरा सराव सामना (हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता)
29 मे – संघ साऊदम्पटन रवाना. विराट कोहली आणि इतर संघाच्या कर्णधारांचे बकिंगहॅम पॅलेस येथे इंग्लंडच्या राणींसोबत चहापान
30 मे – साऊदम्पटन येथे विश्रांतीचा दिवस
31 मे – विश्वचषकाआधीच्या प्रशिक्षण सत्राला सुरुवात

इंग्लंडमध्ये हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा सलामीचा सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थान 16 जूनला मैदानात उतरणार आहे. 2019 विश्वचषक स्पर्धेतील सामने हे रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळवले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक संघाविरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम 4 संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या