निकालाचे टेन्शन खल्लास …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विजय सोनावणे – (संस्थापक अर्र्हम इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट)

येणार येणार म्हणत रिझल्ट काहीच दिवसांवरती येऊन ठेपला आहे. जस जसा रिझल्ट जवळ येतोय तशी विविध स्तरांवरी चर्चेला उधान येताना आपल्याला दिसते. विद्यार्थी आणि पालकांची मनस्थिती काही अंशी किती मार्क मिळतील ? कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार? आवडीचे कॉलेज मिळेल का? एका विशिष्ट विषयाचा पेपर चांगला गेला नाही त्याचा परिणाम काय होईल ? अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थांना नक्कीच पडत असतील.

अपेक्षित रिझल्ट लागला नाही तर विद्यार्थांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार होते. काही पालक रिझल्ट बद्दल खूपच टोकाची भूमिका घेत असतात. पालकांच्या वर्तवणूकीला घाबरून मुले चुकीचे पाऊल उचलतात. आत्महत्या, घरातून पळून जाणे यांसारख्या बातम्या निकालाच्या कालावधीमध्ये आपल्या कानावर येतातच. विद्यार्थांनी अशी पाऊले न उचलता सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांच्या मनामध्ये अज्ञादायी दृष्टीकोन तयार होईल.

विद्यार्थ्यांनी घ्यायची काळजी :

१) अपयश आले तर ते पचवण्याचे धैर्य ठेवा, भूतकाळामध्ये तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्यामधून बोध घ्या.

२) तुमचे ध्येय गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा तुम्हाला आलेले अपयश तुमच्यावर वरचड होऊ देऊ नका .

३) स्वतःमधील सहनशीलता वाढवा

४) परीक्षेमध्ये आलेले अपयश हे क्षणिक आहे स्वतः मधील सकारात्मक दृष्टीकोन वाढवा

५) तुमच्यामध्ये नकारात्मक्ता वाढली असेल तर पालक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पालकांनी घ्यायची काळजी :

१) रिझल्टच्या कालावधीत मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

२) परीक्षेमध्ये मिळणारे मार्क हे मुलाचे आयुष्य ठरवू शकत नाही.

३) एखादे क्षेत्र निवडण्याच्या आधी मुलाचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याची माहिती करून घ्या.

४) मुलगा जरा अभ्यासामध्ये नापास झाला असेल तरी त्याला धीर देऊन एक आशादायक दृष्टीकोन त्याच्या समोर उभा करणे अत्यंत महत्वाचे आहे.

५) आयुष्यामध्ये येणारे खाचखळग्याना आपण हिमतीने सामोरे या बद्दल त्यांना माहिती यावी

६) रिझल्टच्या कालावधीत विद्यार्थांची मानसिकता समजून घेण्याचाप्रयत्न करते फार गरजेचे असते.

७) प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे, जर तुमचा मुलगा एखाद्या विषयामध्ये हुशार नसेल तर दुसऱ्या विषयात तो नक्कीच पारंगत असू शकतो.