विक्रम लँडर सापडला, ऑर्बिटरने पाठवले फोटो

vikram-lander

चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना इस्रोच्या संपर्काबाहेर गेलेला विक्रम लँडर सापडला असून ऑर्बिटरने त्याचे फोटो पाठवले आहेत. मात्र अजून त्याच्याशी संपर्क झालेला नाही, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

 विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरणे अपेक्षित होते त्यापासून 500 मीटर लांब असल्याचे सांगितले जात आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरमध्ये बसवण्यात आलेल्या ऑप्टीकल हाय रिझोल्यूझन थर्मल कॅमेराने (OHRC) विक्रमचे फोटो पाठवले आहेत. या फोटोंमुळे इस्रोच्या वैज्ञानिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून ते ऑर्बिटरच्या माध्यमाने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.  इस्रोचे प्रमुख के सिवन यांनीही ते विक्रमशी संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. तसेच विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर पाहिले गेले आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचा एक थर्मल फोटो पाठवला आहे. पण अजून त्याच्याशी संपर्क झालेला नसून आम्ही संपर्काचा प्रयत्न करत असल्याचे सिवन यांनी टि्वट केले आहे. तसेच लवकरच विक्रमशी संपर्क होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या