
‘विक्रांत बचाव’ च्या नावाखाली लोकांकडून कोट्यावधींचा निधी गोळा करून त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणात नील किरीट सोमय्या यांची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेत साडेतीन तास कसून चौकशी करण्यात आली. आणखी तीन दिवस नील सोमय्याची चौकशी करण्यात येणार आहे.
कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांची चार दिवस कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी कोर्टाच्या निर्देशानुसार नील सोमय्या यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या जनरल चिटिंग युनीट-4 च्या पथकाने साडेतीन तास कसून चौकशी केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रश्नांचीं सरबती करून पोलिसांनी नील सोमय्याचा जबाब नोंदवून घेतला.































































