वनविभागाने दाद न दिल्याने ग्रामस्थांकडून बिबट्याची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गोलाघाट

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात एका बिबट्याने चांगलाच हैदोस घातला होता. ग्रामस्थानी वनविभाकडे या बिबट्याल जेरबंद करण्याची विनंती केली. परंतु विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी या बिबट्याच काटाच काढला.

गोलाघाट जिल्ह्यातील एका गावात चहाच्या मळ्यात एका बिबट्याने चांगलाच धुमाकाळ घातला होता. त्याच्या हल्ल्यात अनेक ग्रामस्थ जखमी झाले होते. बिबट्यामुळे चहा तोडणारे कामगार बाहे पडण्यास धजावत नव्हते. तसेच बायका मुलांमध्येही बिबट्याची दहशत होती. ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. परंतु वनविभागाने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

शेवटी बिबट्याने पुन्हा एकदा गावातीला एका माणसावर हल्ला केला. तेव्हा चिडलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याचा माग काढला आणि त्याला लाठ्या काठ्यांनी मारून त्याचा जीव घेतला.