ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर गावकऱ्यांचा ठिय्या, पर्यटक अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पळसगावच्या गावकऱ्यांनी पर्यटकांचा मार्ग रोखून धरला आहे. मोहर्ली प्रवेशद्वारावर शंभरावर गावकरी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. गावकऱयांना ये-जा करण्यास, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी नेहमी त्रास देतात. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाला धडा शिकवण्यासाठी गावकऱयांनी आज पहाटे चार वाजताच मोहर्ली गेटसमोर ठिय्या देऊन पर्यटकांची वाहनं रोखून धरली. रविवार असल्यानं आज ताडोबात मोठी गर्दी असते, पण सकाळच्या फेरीसाठी एकही जिप्सी ताडोबात जाऊ शकली नाही. गावकाऱयांच्या या आंदोलनामुळं ताडोबा व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे.