खासदार विनायक राऊत हे २०१९ ची लोकसभा निवडणूक बहुमताने विजयी होतील : पालकमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती होणार की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे. मात्र असे असले तरी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत खासदारकीचे उमेदवार हे विद्यमान खासदार विनायक राऊत हेच असणार असून ते प्रचंड बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास पालकमंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समिती सभा संपन्न झाल्याननंतर पत्रकारांशी संवाद साधाना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा मधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. तसे त्यांनी जाहीरही केले आहे. याबाबत पालकमंत्री दिपक केसरकर विचारले असता ते म्हणाले की, चालू वर्षी होवू घातलेली लोकसभा निवडणूकीत कोणही उभे राहु शकते. आणि जठार हे भाजपा या स्वतंत्र पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी तसे जाहीर केले आहे. मात्र दरवेळी लोकसभा निवडणूक युतीच्या माध्यमातून लढविली जात आहे. परंतू आता युती होईल की नाही हे पक्षश्रेष्टी निर्णय घेणार आहे. मात्र युती झाली अथवा नाही झाली तरी शिवसेना पक्षातून लोकसभा निवडणूक हे विद्यमान खासदार विनायक राऊत लढविणार आहेत आणि ते काही झाले तरी बहुमतांनी विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच त्यांच्या विरोधात कोण उभा राहील तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांना जनता अद्दल घडवेल: पालकमंत्री केसरकर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेताल आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. त्यावर बोलताना पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रासह देशाची जनता ज्यांचा आदर करते. महाराष्ट्रात ज्याला देवाची उपाधी दिली जाते, अशा आदरणीय व्यक्तिबाबत अशी विधाने करणे योग्य नाही. बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना जनता अद्दल घडवेल असे सांगत कोणी कोणावर काय बोलावे याचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे असा सल्ला देत नीलेश राणे आधीच जनतेच्या मनातून उतरले होते आणि आता बाळासाहेबांवर आरोप केल्याने ते जनतेच्या मनातून साफ नाहीसे झाले असल्याचा टोला पालकमंत्री दिपक केसरकर यांनी लावला.