ट्रेंड – बादल्या, डबड्यांचा बनवला ड्रमसेट; नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलेची आवड असेल तर कोणत्याही साधनांच्या मदतीने ती साधता येते असे म्हणतात ना. एका तरुणाने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. या तरुणाने बादल्या आणि डबडय़ांच्या मदतीने ड्रमसेट बनवला आणि तो सेट असा वाजवला की, ते पाहून नेटकऱयांनी त्याच्यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडला. त्याने अप्रतिमपणे वाजवलेला बादल्यांचा ड्रमसेट ऐकून एखादा प्रोफेशनल ड्रमसेटला थेट टक्कर दिली. हा व्हिडीओ rajuldrums25 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.