
एक महिला आपल्या कुत्र्यावर इतक प्रेम करते की ती त्याला शोधण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. हे प्रकरण सॅन फ्रान्सिस्कोचे आहे. जिथे एमिली टेलरमो नावाच्या महिलेचा पाच वर्षांचा कुत्रा बेपत्ता झाला आहे. गेल्या आठवड्यात महिलेचा ऑस्ट्रेलियन शेफर्ड (कुत्र्याची जात) कुत्रा किराणा दुकानातून चोरी झाला आहे. आता या महिलेने आपला कुत्रा शोधून देणाऱ्याला 5 लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
या महिलेच्या पाळीव कुत्राचे नाव जॅक्सन असे होते. या कुत्रीला शोधण्यासाठी महिलेने 85,000 रुपयांत विमान भाड्यावर घेतले होते. या विमानाच्या मदतीने महिलेने शहर भरात कुत्र्याचा शोध घेतला. इतकच नाही तर कुत्र्याचा शोध घेण्यासाठी या महिलेने bringjacksonhome ही वेबसाइट ही बनवली आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुत्र्याचे वजन 13 किलो आहे, ज्याचे काळा, पांढरा आणि राखाडी फर आहे. तसेच, त्याचे डोळे निळे आहेत. आणि हो, या महिलेने कुत्र्याचे टिंडर खातेही तयार केले आहे. एमिलीचे इंस्टाग्राम पाहिल्यानंतर आपणास समजेल की एमिली तिच्या कुत्र्या जॅक्सवर इतके प्रेम का करते. इंस्टावर 3 हजाराहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात.


























































