
लिफ्टमध्ये कुत्रा दिसल्यावर एका मुलीने घाबरून केलेल्या कृतीने नेटकऱ्यांची चांगलीच करमणूक झाली आहे. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक महिला तिच्या पाळीव कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये उभी असते. इतक्यात दुसरी मुलगी लिफ्टमध्ये येते. कुत्रा दिसताच ती घाबरून मागे सरकते. जेव्हा कुत्र्याची मालकीण तिला, “तो चावणार नाही,” असे सांगते, तेव्हा ती मुलगी घाबरत-घाबरतच लिफ्टमध्ये शिरते.
पुढे जेव्हा कुत्र्याची मालकीण कुत्र्याला ‘खाली बस’ (Sit down) असे सांगते, तेव्हा ती मुलगी स्वतःच खाली बसते. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. एका युझरने लिहिले, ‘तिचे डोके काम करत नाहीये.’ दुसऱ्याने म्हटले, ‘तिने मालकिणीचे म्हणणे भलतेच मनावर घेतलेले दिसतेय.’ हा व्हिडिओ @shreya._.9x या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.




























































