राखी बांधणाऱ्या मुस्लीम भावाचा हिंदू महिलेवर बलात्कार? काय आहे सत्य…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी काही फोटोंना फोटोशॉप वापरून चुकीच्या पद्धतीने दाखवले जाते तर काही घडलेले नसतानाही तसे दाखवण्याचा मेसेज पाठवला जातो. असाच एक प्रकार रक्षाबंधन या बहीण-भावाच्या पवित्र सणानंतर घडला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या दोन फोटोंपैकी एका फोटोत हिंदू महिला मुस्लीम पुरुषाला राखी बांधताना दिसत असून दुसऱ्या फोटोत महिला गंभीर जखमी दिसत आहे. यासोबत असा दावा करण्यात आला आहे की हिंदू महिलेने ज्या मुस्लीम पुरुषाला राखी बांधली त्याने नंतर तिच्यावर बलात्कार करून गंभीर मारहाण केली. परंतु व्हायरल होणाऱ्या या मेसेजचे सत्य वेगळे आहे.

rakshabandhan-viral-image

व्हायरल होणाऱ्या या फोटोंमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याचा धोका असल्याने पोलिसांनी याबाबतचे सत्य सांगितले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्वीट करत हे फोटो आणि माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच पहिला फोटो हा रक्षाबंधनाचाच असून असे अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते की हिंदू आणि मुस्लीम समाज एकत्र सण साजरे करतो. हा फोटो यापूर्वी 21 डिसेंबर 2017 रोजी देखील दोन धर्मातील एकोपा दाखवण्यासाठी शेअऱ करण्यात आला होता.

दुसऱ्या फोटोबाबत असा दावा करण्यात आला की राखी बांधलेल्या महिलेवर बलात्कार करून तिला गंभीर मारहाण करण्यात आली. परंतु गूगलवर हा फोटो शोधण्यात आला तेव्हा हा फोटो 21 नोव्हेंबर 2016चा असल्याचे दर्शवण्यात आले. हा फोटो कानपूरमधील एका रुग्णालयातील रेल्वे अपघातात जखमी महिलेचा आहे. या प्रकरणी गोंडा पोलिसांनी ट्विटरवर फोटोचे सत्य सांगितले आहे.