Video – आई तशी लेक; काजोलची मुलगी ‘नीसा’ने आईच्या गाण्यावर शाळेत केला भन्नाट डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री काजोलची मुलगी नीसा देवगणचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीसा ही सध्या सिंगापूरमध्ये शिकत आहे. व्हायरल होणार व्हिडीओ हा तिच्या कॉलेज फंक्शनमधला आहे. या व्हिडीओत ती आई काजोलच्या हिट गाण्यांवर परफॉर्म करताना दिसत आहे.

काजोल आणि अजय देवगणच्या चाहत्यांना नीसाचा हा व्हिडीओ पसंद पडल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओ काही दिवस आधीचा असून नीसाच्या फॅन पेजवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये नीसा सर्वात आधी ‘बोले चुडिया’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यानंतर ‘सज्दा’ आणि ‘तेरे नैना’ या गाण्यांवरही ती तिच्या ग्रुपसह उत्तम डान्स सादर करताना दिसत आहे. व्हाइट टॉप आणि फ्लेयर्ड स्कर्टमध्ये नीसाने खूपच चांगला परफॉर्म दिला आहे. त्याचवेळी त्याच्याबरोबरची मुले कुर्ता पायजामामध्ये दिसत आहेत.