
सोशल मीडीयावर दरदिवशी वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहीवेळेला हे व्हिडीओ मजेदार असतात तर काहीवेळेला वास्तव दर्शवणारे असतात. असाच एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. एका डिलिव्हरी बॉयला परिस्थितीमुळे त्याच्या नेहमीच्या कामासोबत असेही काम करावे लागत आहे जे पाहून तुम्हीही भावूक झाल्याशिवाय राहणार नाहीत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक झोमॅटो डिलीव्हरी करणारा तरुण दिसत आहे. जो दारोदारी जाऊन फूड डिलिव्हरी करत आहे. मात्र या डिलिव्हरी बॉयच्या कांगारु बॅगेतील लहान मुलगी आणि लहान मुलगा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र या मागचे कारण कळल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल. हा व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की पाहा.
View this post on Instagram
या डिलिव्हरी बॉयला जेव्हा या मुलांबाबत विचारले त्यावेळी त्याने सांगितले की दोन्ही त्याची मुले आहेत. जेव्हा तो फूड डिलीव्हरी करायला जातो त्यावेळी दोन्ही मुलांना बाईकवर सोबत घेऊन जातो. त्या मुलांना सांभाळायला घरी कोणीच नसल्याने त्याला ही जबाबदारी घ्यावी लागली. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.
हा व्हिडीओ इस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेकदा पाहण्यात आले आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या डिलिव्हरी बॉयची प्रशंसा केली आहे तर काहींनी रोजगार मिळवणे खरेच कठिण झाले असा



























































