
क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सेलिब्रेटी कपल्स दुसऱयांदा आई-बाबा झाले असून लंडनमध्ये त्यांनी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. विराट आणि अनुष्काने मंगळवारी रात्री केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेय, आम्हाला सर्वांना कळविण्यास आनंद होतो की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा आणि वामिकाचा लहान भाऊ ‘अकाय’चे स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणात तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या. सर्वांना विनंती आहे की, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून सेलिब्रेटी आणि चाहते विराट-अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.


























































