धोनी-डिव्हिलिअर्सला जे जमले नाही ते विराटने करून दाखवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लीड्स

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची भूमिका सांभाळताना ३ हजार धावांचा टप्पा ओलांडला. सर्वात कमी डावात हा टप्पा गाठणारा तो पहिला कर्णधार आहे.

कोहलीने या यादीमध्ये हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर एम.एस. धोनी आणि दक्षिण आफ्रिकेचा थ्री सिक्स्टी खेळाडू ए.बी. डिव्हिलिअर्सलाही मागे सोडले आहे. कोहलीने फक्त ४९ व्या डावात ३ हजार धावांचा टप्पा गाठला आहे तर डिव्हिलिअर्सला हा टप्पा गाठण्यासाठी ६० डाव खेळावे लागले होते. तर नुकताच एक दिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या धोनी यासाठी ७० डा खेळले होते.

विराटने सध्या २११ सामन्यातील २०३ डावा फलंदाजी करताना ९७७९ धावा ठोकल्या आहेत. यात त्याच्या ३५ शतकं आणि ४८ अर्धशतकं ठोकली आहेत.