पाहा: केदारनाथ गोठले, मंदिर बर्फाखाली झाकले गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kedarnath-snowfall

सामना ऑनलाईन । केदारनाथ

हिंदू भाविकांच्या आस्था आणि श्रद्धेचे स्थान असलेले केदारनाथ मंदिर बर्फाखाली झाकले गेले आहे. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून बर्फाच्छादित परिसर अतिशय सुंदर भासत आहे.

उत्तर हिंदुस्थानात कडाक्याची थंडी सुरू झाली असून हिमालय पर्वतरांगांमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये बर्फ वृष्टी सुरू आहे. डोंगर,रस्ते, झाडं, घरं सर्वांवर बर्फाची चादर पांघरली आहे. डिसेंबर महिन्यात दरवर्षी निसर्गाचा असाच अनुभव घेण्यासाठी पर्यटक प्रचंड गर्दी करतात.