मेट्रोच्या भुयारांमध्ये व्होल्टासचे व्हेंटिलेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पाच्या भुयारांमधील वातानुकूलन (व्हेंटिलेशन) यंत्रणेचे कंत्राट मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसीएल) व्होल्टास कंपनीला दिले आहे. या मेट्रो मार्गावरील मुंबई सेंट्रल ते कफ परेड या टप्प्यातील व्हेंटिलेशन आणि पर्यावरण नियंत्रण यंत्रणा व्होल्टास कंपनी बसवणार आहे.

जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे कंत्राट देण्यात आले. कंत्राटानुसार व्हेंटिलेशन यंत्रणेचे डिझाईन बनवणे, निर्मिती, पुरवठा, यंत्रणा बसवणे, चाचणी आणि यंत्रणा चालवण्याचे काम व्होल्टासला करावे लागणार आहे. व्हेंटिलेशन यंत्रणेमुळे मेट्रोच्या भुयारांमधील हवेचे तापमान कमी ठेवता येणार आहे. तसेच आगीच्या दुर्घटनेप्रसंगी धुरावर नियंत्रण ठेवता येणार आहे.