जिथे लोजपचे उमेदवार नाही तिथे भाजपला मतदान करा, चिराग पासवान यांचे आवाहन

लोक जनशक्ती पक्ष हा एनडीचा घटक पक्ष नाही असे भाजपने जाहीर केले आहे. असे असले तरी लोजपने भजापला पाठिंबा दिला आहे. तसेच जिथे लोजपचा उमेदवार नाही तिथे भाजपला मतदान करा असे आवाहनही चिराग पासवान यांनी केले आहे.


चिराग पासवान यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना आवाहन करताना म्हणाले की, जिथे जिथे लोजपचे उमेदवार आहेत तिथे त्यांना मतदान करा. अन्यथा भाजप उमेदवाराला मतदान करा. आगामी सरकार हे नितीशकुमार मुक्त सरकार असले पाहिजे असेही पासवान म्हणाले.

चिराग पासवान यांनी सातत्याने नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे. ट्विटरवर नितीश कुमार यांच्यावर टीका करताना पासवान म्हणाले की दारू बंदीच्या नावाखाली बिहारी जनतेला दारू तस्कर बनवले जात आहे. बिहारच्या माता भगिनी आपल्याच माणसांना तस्करी करताना पहायचे नाही. बिहारच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना माहित आहे की रोजगरा अभावी लोक दारू तस्करीकडे वळले आहेत. असे असले तरी मुख्यमंत्री यावर गप्प बसून आहेत असेही पासवान म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या