
सामना ऑनलाईन । नाशिक
लोकसभा निवडणूक मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार सन 2014च्या तुलनेत यावेळी जिह्यात 3 लाख 65 हजार 465 जास्त मतदान झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात 1 लाख 90 हजार 31, तर दिंडोरीत 1 लाख 75 हजार 434 इतके जास्त मतदान झाले.
सन 2014च्या निवडणुकीत नाशिक मतदारसंघात एकूण 58.82 टक्के म्हणजे 9 लाख 28 हजार 489 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत 59.28 टक्के म्हणजे 11 लाख 18 हजार 520 मतदारांनी मतदान केले. दिंडोरीत 2014ला 63.52 टक्के म्हणजे 9 लाख 59 हजार 285 इतके मतदान झाले होते. यावेळी तेथे 65.64 टक्के म्हणजे 11 लाख 34 हजार 719 इतके मतदान झाले आहे. या दोन्ही मतदारसंघाचे 2019चे मतदान आणि त्यापुढील कंसात 2014 चे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान पुढीलप्रमाणे
नाशिक लोकसभा मतदारसंघ : सिन्नर – 1,94,316 (1,61,265); नाशिक पूर्व – 1,94,120 (1,54,001); नाशिक मध्य – 1,76,780 (1,47,736); नाशिक पश्चिम- 2,17,105 (1,62,994); देवळाली – 1,60,150 (1,43,852); इगतपुरी- 1,76,049 (1,56,652).
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ : नांदगाव- 1,81,670 (1,48,363); सुरगाणा-कळवण- 1,94,377 (1,67,076); चांदवड- 1,81,648 (1,52,714); येवला- 1,80,746 (1,61,262); निफाड- 1,69,538 (1,50,181); पेठ-दिंडोरी- 2,26,740 (1,79,009).



























































