‘व्हीव्हीपॅट’च्या शेकडो पावत्या फेकल्या रस्त्यावर

मतचोरीवरून देशात गदारोळ उठला असताना बिहारमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर दोन दिवसांनी समस्तीपूर जिह्यातील सरायगंज येथे ‘व्हीव्हीपॅट’च्या शेकडो पावत्या रस्त्यावरील कचराकुंडीत फेकलेल्या आढळल्या. त्यामुळे खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने याप्रकरणी एका निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित केले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यावर खुलासा केला आहे. मतदानाआधी मतदान केंद्रावर झालेल्या ‘मॉक पोलिंग’च्या वेळच्या या पावत्या आहेत, असे त्यांनी सांगितले.