
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपासाच्या अनुषंगाने पहलगाममधील 100 हून अधिक कश्मिरी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे; परंतु हे योग्य नाही. सर्व पर्यटन स्थळे बंद असून त्या ठिकाणी सुरक्षा दल तैनात करण्याची गरज आहे. तसेच पहलगाममध्ये पर्यटकांना घोडे पुरवणाऱयांना आर्थिक मदत द्यावी. वर्षभरासाठी हॉटेल आणि टॅक्सीचालकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.