
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला टी-20 सामना 6 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर खेळविला जाणार होता. मात्र 6 डिसेंबरला मुंबईत कडेकोट बंदोबस्त असतो त्यामुळे पोलिसांकडून आवश्यक ते पोलीस बल मिळणार नाही असे पोलीस आयुक्तांनी सांगितल्यानंतर हा सामना आता हैदराबादला हलविण्यात आला आहे.
The 1st T20i between India and West Indies, which was scheduled to be played in Mumbai on the 6th of December, 2019 has now been shifted to Hyderabad.
— ANI (@ANI) November 27, 2019
6 डिसेंबरला बाबरी मशीद तोडण्यात आली होती. त्यासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त असतोच. शिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनही 6 डिसेंबरला असतो. लाखो अनुयायी त्या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्यासाठीही मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो.
वानखेडेवरील सामन्याला एक हजार पोलिसांची गरज आहे. मात्र एवढी सुरक्षा देणे शक्य नसल्याचे पोलीस आयुक्तांनी एमसीएला कळवले होते. त्यापार्श्वभूमीवर हा सामना हैदराबदला खेळविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 11 डिसेंबरला हैदराबाद येथे तिसरा सामना होणार होता. मात्र आता पहिला सामना तिथे होणार असल्याने तिसरा सामना कदाचित मुंबईतील वानखेडेवर खेळवला जाऊ शकतो.


























































