वर्धा, अमरावती जिल्ह्यातील युवासेनेच्या पदांकरिता मुलाखती

वर्धा व अमरावती जिह्यातील युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून, सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. शनिवार 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे तर रविवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुलाखती होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येतील. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे, अशी माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.