युद्ध हा काही पर्याय असू शकत नाही, जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे मत

शांतता निर्माण व्हायला वेळ लागतो आपण संयम ठेवला पाहिजे असे विधान जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले. तसेच युद्ध हा काही पर्याय असू शकत नाही असेही मुफ्ती म्हणाल्या.

माध्यमांशी बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, शस्त्रसंधी पूर्ण व्हायला वेळ लागतो. जेव्हा दोन देशांच्या फौजा भेटतात तेव्हा शांतता निर्माण व्हायला वेळ लागतो. त्यामुळे संयम ठेवणे गरजेचा आहे. आपण नेहमीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण करता कामा नये. युद्धात लोकांचा मृत्यू होतो, घरं नेस्तनाबूत होतात, लहान मुलं मारली जातात, अनाथ होता. त्यामुळे युद्ध हे पर्याय नाही आपण संयम ठेवला पाहिजे असेही मुफ्ती म्हणाल्या.