बदला घेतला… क्लच चेस चॅम्पियनशिपमध्ये गुकेशने हिकारू नाकामुराचा केला पराभव

‘क्लच चेस: चैम्पियंस शोडाउन’ च्या पहिल्या दिवशी चेस चॅम्पियन डी गुकेशने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव घेत मागच्या पराभवाचा बदला घेतला आहे. नाकामुराला हरवल्यानंतर गुकेशने शांतपणे आपला आनंद व्यक्त केला. त्याच्या या शांतपणाचे सध्या सोशल मीडयावर कौतुक होत आहे.

या चॅम्पियनशिपमध्ये जगभरातील फक्त आघाडीचे खेळाडूच भाग घेतात. यंदा या स्पर्धेत गुकेश, मैग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फैबियानो कारुआना यांनी भाग घेतला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कार्लसनने गुकेशला 1.5-0.5 ने हरवले. मात्र गुकेशने कमबॅक करत दुसऱ्या डावात नाकामुराला 1.5–0.5 ने हरवले तर तिसऱ्या डावात कारुआना ला 2–0 ने हरवले. अशा प्रकारे पहिल्या दिवशी या स्पर्धेत गुकेश आघाडीवर राहिला.

याआधी 5 ऑक्टोबरला खेळल्या गेलेल्या एका सामन्यानत नाकामुराने गुकेशला हरवल्यानंतर त्याच्या सोंगट्यांमधील राजाला उचलून स्पर्धकांमध्ये फेकले होते. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.