
एप्रिल आणि मे महिन्यांच्या आग ओकणाऱ्या उन्हाळय़ामुळे गोदावरीसह सर्चव नद्यांची पात्रे कोरडीठाक पडली आहेत. जलस्रोतांनी शरणागती पत्करली आहे. गोदावरीच्या विस्तीर्ण पात्रात पाण्याऐवजी वाळूचे पट्टे दिसत आहेत. तर सिंदफणा नदी, सरस्वती नदी आणि बिंदुसरा नदी या नद्याही पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेल, विहिरी, आड, शेततळी आटू लागली आहेत. त्यामुळे तहान भागवणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आता महत्वाचा वाटू लागला असून पावसाळय़ात काही नक्षत्रे कोरडी जाणार तसेच ‘अल निनो’ वादळामुळे पाऊसमान घटणार असल्याने भविष्यात भीषण पाणी संकटाची भीती व्यक्त होत आहे.
यंदा पावसाने तारले, जोरदार पावसासह काही केळा अतिवृष्टीही झाली, पिकांची नासाडी झाली, जलसाठे भरले, मात्र एप्रिलपासूनच तापमानाने चाळिशी पार केली आणि मे महिन्यात उष्णतेने किक्राळ रूप धारण केले. परिणामी नदीपात्रातील पाण्याचे बाष्पीभवन झपाटय़ाने काढले. भूजलाची पातळी इतकी खाली गेली की, अनेक गावांमध्ये पाचशे ते सहाशे फूट खोल बोअरलाही पाणी लागत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे. काही ठिकाणी पहाटेपासून महिलांच्या हंडय़ांच्या रांगा लागत आहेत. गोदाकाठीच्या काही गाकांमध्ये दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. चिंतेची बाब ही आहे की, आगामी पावसाळा जेमतेम असल्याचा अंदाज हकामान खात्यासह पंचांगाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱयांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही तर वर्षानुवर्षांच्या चुकीच्या जलनियोजनाची किंमत आहे. भूजलचा अनियंत्रित उपसा, सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे घटलेले जलमुरण, नाल्यांचे अतिक्रमण, वृक्षतोड आणि जलसंधारणातील ढिसाळपणा यामुळे मातीत पाणी साठवण्याची क्षमता संपत चालली आहे. हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूपही बदलले आहे. कमी दिवसांत अतिवृष्टी आणि नंतर दीर्घ कोरडा कालावधी यामुळे जलचक्रच विस्कळीत झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मे महिन्यातच निर्माण झालेली ही अकस्था जून-जुलैपर्यंत अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
गोदावरीसारखे सिंदफणा, कुंडलिकेला बॅरेजेस हवे
गोदावरी नदीवर नाशिकपासून नांदेडच्या विष्णुपुरीपर्यंत ठराविक अंतरावर पाणी साठवण्यासाठी निर्माण केलेले बॅरेजेस निर्णायक ठरल्याने शेकडो गावांना लाभ झाला आहे. या बॅरेजेसमुळे काही भागांत बारा महिने गोदावरी तुडुंब भरलेली दिसते. पावसाळ्यात बीड जिल्ह्यातील बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा, वांजरा, वाण, अमृता, सरस्वती, कडी या नद्यांना प्रचंड पूर येतो. पुराचे पाणी वाहून जाते. हे पाणी थांबले पाहिजे, मातीत मुरले पाहिजे त्यासाठी आता या नद्यांवरही बॅरेजेस आवश्यक आहेत.
यंदा दुष्काळ शेतकऱयांच्या दारात
विविध स्रोतांच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनने उशीर केला किंवा पावसाचे प्रमाण कमी राहिले तर अनेक गावांमध्ये टँकरशिवाय पर्याय उरणार नाही. प्रशासनासमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे आव्हान उभे राहणार असून ग्रामीण अर्थक्यकस्थेलाही त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे जलसंधारण, वृक्षलागवड, पाणी पुनर्भरण आणि भूजल वापरावर कठोर नियंत्रण या उपाययोजना तातडीने राबवल्या नाहीत तर पुढील वर्षांत ‘दुष्काळ’ हा प्रत्येक घराच्या दारात उभा दिसेल.



























































