वसतिगृहातील पाणीटंचाईची कोर्टाकडून दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील मादाम कामा गर्ल्स हॉस्टेलमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईची मुंबई उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. प्रसारमाध्यमांतील वृत्तांची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणी स्युमोटो जनहित याचिका दाखल करून घेत यावर 1 सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

विद्यापीठाच्या चर्चगेट येथील वसतिगृहात 100 हून अधिक विद्यार्थिनी राहत असून, गेल्या काही दिवसांपासून अपुऱया पाणीपुरवठय़ामुळे त्यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे.