परभणीकरांची पाण्यासाठी पायपीट 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

परभणी शहर महापालिकेच्या वतीने शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. तब्बल १० ते १५ दिवस उलटले तरीही पाणीपुरवठा करण्यास मनपा असमर्थ ठरत आहे. याबद्दल नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान,परभणी शहरातील काही भागात टँकरच्या पाण्यावर नागरिकांना दिवस ढकलावे लागत आहेत.

एकीकडे महानगरपालिका घरपट्टी आणि पाणीपट्टीसाठी नागरिकामागे तगादा लावत आहे. अनेक ठिकाणी १० ते १५ दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये मनपाच्या कारभाराबदद्ल अंसोष खदखदू लागला आहे. तर काही ठिकाणी नगरसेवक टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करत आहेत. परभणी शहरात सर्वत्र पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले असून  पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहत. तर पाणीविक्रेते या परिस्थितीचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने पाण्याची विक्री करत आहेत.

दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या तारा व खांब उखडले गेले आहेत. यामुळे बोरचे पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.