चेंबूर, गोवंडी, माहुलमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद; वाशी नाका येथे जलवाहिनीची जोडणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूरच्या वाशी नाका येथे बुधवारी सकाळी 10 वाजेपासून गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने जलवाहिनी जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे चेंबूर, गोवंडी, माहूल या परिसरातील पाणीपुरवठा या दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने बुधवार, 29 मे रोजी सकाळी 10 ते गुरुवार, 30 मे पर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे 450 मिलीमीटर आणि 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एम-पूर्व आणि एम-पश्चिम विभागातील काही भागांचा या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, या परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा, पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

एम पूर्व विभाग
लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीरामनगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्प, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पेरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पेरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पेरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस.

एम पश्चिम विभाग
माहुलगाव, आंबापाडा, जिजामातानगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजीनगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी.